सुरक्षेच्या दृष्टीने यंदाचे विश्वचषक आव्हानात्मक

    दिनांक :29-May-2019
लंडन, 
इंग्लंड अॅण्ड वेल्समधील हे पहिले विश्वचषक क्रिकेट असावे की, यात धावा, खेळपट्‌ट्या व झेल यापेक्षा सुरक्षा हा शब्दा अधिक चर्चिला गेला आहे. आगामी 30 मेपासून इंग्लंडमध्ये होणार्‍या विश्वचषक कि‘केट स्पर्धेसाठी कडक सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला आहे. गत काही महिन्यात क्रिकेट खेळणार्‍या देशात- भारत, न्यूझीलंड व श्रीलंकेत दहशतवादी हल्ले झालेत. त्यापृष्ठभूमीवर इंग्लंडमध्ये विश्वचषकादरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
 
 
 
 
 
सुरक्षेच्या दृष्टीने यंदाचे विश्वचषक कितीही आव्हानात्मक असले तरी आमचा सुरक्षा विभाग दोन हात करण्यास सज्ज आहे, असे विश्वचषक सुरक्षा चमूचे प्रमुख जील मॅकक्रेकन यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
 
 
विश्वचषकात कुठलीही अनुचित घटना घडून आनंदावर वीरजण पडू नये म्हणून आम्ही स्पर्धास्थळी सुरक्षा व्यवस्थेचा चोख बंदोबस्त केला आहे. मात्र त्याविषयी माहिती उघड करणार नाही. याविषयी सर्व सदस्य बोर्डांना लेखी कळविले आहे. तसेच आपल्या संघासोबत वैयक्तिक सुरक्षा सल्लागार घेऊन येण्याची सूचनासुद्धा प्रत्येक सदस्य बोर्डाला केलेली आहे. सर्व सदस्य देश सुरक्षाव्यवस्थेवर खूश आहेत, असे त्या म्हणाल्या.