चॅम्पियन्स लीग फायनल; हॅरी केन सज्ज

    दिनांक :29-May-2019
लंडन,
 
 
शनिवारी माद्रिद येथे लिव्हरपूलविरुद्ध होणार्‍या चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या अंतिम सामन्यासाठी टोटेनहॅम हॉटस्परचा आक्रमक खेळाडू हॅरी केन सज्ज झाला आहे. मॅन्चेस्टर सिटीविरुद्धच्या पहिल्या चरणाच्या उपांत्यपूर्व सामन्यादरम्यान इंग्लंड फुटबॉल संघाचा कर्णधार हॅरी केन याच्या घोट्याला दुखापत झाली होती व तेव्हापासून तो फुटबॉल मैदानापासून दूर होता.
 
 
 
 
 
 
त्यानंतर तो तंदुरुस्त होऊन नुकताच सराव शिबिरात दाखल झाला. गत आठवड्याअखेरीस मी संघासोबत जुळल्यामुळे आता बरे वाटते. आता दुखापतीची कोणतीही समस्या नाही. आता संघाचे व्यवस्थापकच ठरवतील की, मी खेळण्यासाठी सज्ज आहो की नाही, परंतु मला चांगले वाटत आहे व मी सज्ज आहे, असे हॅरी केन म्हणाला.