'बंटी और बबली'चा सिक्वेल येणार?

    दिनांक :29-May-2019
मुंबई:
'कजरा रे सारखी' गाणी असो किंवा चित्रपटाची भन्नाट कथा २००५ साली आलेला 'बंटी और बबली' चित्रपट तुफान गाजला होता. अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचा सिक्वेल आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे.

 
 
'बंटी और बबली'चित्रपटाचा सिक्वेल करायचा असा गेली अनेक वर्ष दिग्दर्शक शाद अलीच्या डोक्यात होतं. आता त्या प्रोजेक्टवर काम सुरू होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'या सिक्वेलचं नाव 'बंटी और बबली अगेन' असं असणार आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत चित्रपटाचा सेट उभारला जाणार असून चित्रपटाच्या चित्रीकरणाला जुलै महिन्यात सुरुवात होणार आहे.' 'बंटी और बबली अगेन' मध्ये गेल्या चित्रपटाची कथा पुढे नेण्यात येणार आहे. बंटी और बबलीमध्ये मुख्य भूमिकेत असलेले अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी या सिक्वेलमध्येदेखील असणार आहेत.