उच्च रक्तदाबात सांभाळा आहारतंत्र
   दिनांक :03-May-2019
उच्च रक्तदाबाची समस्या सर्वसामान्य झाली आहे. तरूणांपासून प्रौढांपर्यंत अनेक जण या विकाराने ग्रासलेले असतात. उच्च रक्तदाब आरोग्यासाठी धोकादायक मानला जातो. ह्दयविकार, मेंदूच्या नसा फाटणं (ब्रेन हॅमरेज) यांसारख्या आजारांचा सामना यामुळे करावा लागू शकतो. उच्च रक्तदाबात पथ्यपाण्याला प्रचंड महत्त्व आहे. उच्च रक्तदाबात काय खावं आणि काय टाळावं, याविषयी... 

 
  • तिखट पदार्थांचं अतिसेवन, अतिरिक्त मद्यपान, आहारातलं अतिरिक्त मीठाचं प्रमाण आणि जंक फूडचा अतिरेक यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते.
  • उच्च रक्तदाबात कॉफी पिणं टाळायला हवं. यातल्या कॅफेनमुळे रक्तदाब वाढतो.
  • केक, पेस्ट्रीजमधल्या सॅच्युरेटेड फॅट्‌समुळे रक्तातली साखरेची पातळी वाढते आणि रक्तदाबही वाढतो.
  • मीठातल्या सोडियममुळे रक्तदाब वाढतो.
  • प्रक्रिया केलेलं अन्न आणि फ्रोजन पदार्थांमध्ये नायट्रेट्‌सचं प्रमाण बरंच जास्त असतं. याची परिणती रक्तदाब वाढण्यात होते.
  • लाल मांसातल्या फॅटी ॲसिड्‌समुळे रक्तदाब वाढतो.
  • आहारात लिंबाचा समावेश करावा. यातील क जीवनसत्त्वामुळे रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो.
  • केळातील पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
  • हळदीत करक्युमिन हा घटक असतो. यामुळे रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुरळीत होऊन उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.
  • ग्रीन टीमधल्या पॉलीफेनॉल्स कॅटेचीनमुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.