उसाचा रस उत्तम की हानिकारक?
   दिनांक :03-May-2019
उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्याकडून फळांच्या रस पिण्यावर जास्त भर दिला जातो. या दिवसांत उसाचा रसालाही मोठ्या प्रमाणात मागणी असते. आरोग्यासाठी उसाचा रस उत्तम असला तरीपण तो तितकाच हानिकारकही असतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. उसाच्या रसाचे दुष्परिणाम जाणून घेऊ या. 
 
 
बहुतेककरून बर्फ रसवंतीवर मिळणार्‍या उसाच्या रसात टाकला जातो. रस अशा ठिकाणी पिण्याआधी स्वच्छतेची खात्री करून घ्या. उसाला अनेकदा बुर्शी लागलेली असते. स्वच्छतेअभावी त्यामुळे अमीबियासिस आणि पेचिस असे जीवघेणे आजार होऊ शकतात.
लाल रंगाच्या उसापासून काढलेला सर जास्त हानिकारक असतो. रेड रॉट डिजीज लाल रंगामुळे होऊ शकतो असे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. उसातील गुणत्त्वामुळे त्याचा रंग लाल होतो. हेपेटाइटिस ए, आणि डायरिया तसेच पोटाचे विकार ज्यामुळे होण्याची दाट शक्यता असते, असे तज्ज्ञ सांगतात.