'तुला पाहते रे'मध्ये सुबोधच्या मुलाची एन्ट्री
   दिनांक :03-May-2019
मुंबई,
'तुला पाहते रे' या मालिकेत रोज नवेनवे ट्विस्ट येत आहेत. मंगळवारी राजनंदिनी म्हणजेच शिल्पा तुळसकरची एन्ट्री मालिकेत झाल्यानंतर तिच्यासोबत छोटा जयदीपही झळकला. राजनंदिनीसोबत दिसलेला छोटा जयदीप हा दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता सुबोध भावेंचा मुलगा मल्हार आहे.

 
मल्हारची ही पहिलीच मालिका असून याआधी एका मराठी चित्रपटातदेखील तो झळकला होता. काही दिवसांपूर्वी स्वराज्यरक्षक मालिकेत डॉ. अमोल कोल्हे यांच्या मुलीने सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या मुलीची भुमिका साकारली होती. सध्या 'तुला पाहते रे' मध्ये फ्लॅशबॅकच्या माध्यमातून जुना काळ दाखवत असून राजनंदिनी आणि विक्रांत सरंजामे म्हणजेच गजा पाटील यांची कथा यामध्ये दाखवण्यात येत आहे.