'बिग बॉस मराठी २' मध्ये येणार किर्तनकार?
   दिनांक :03-May-2019
सुरेखा पुणेकर आणि रामदास आठवले यांची नावं चर्चेत आल्यानंतर आता 'बिग बॉस'च्या घरात कोण येणार याची उत्सुकता वाढली असतानाच बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सिझनमध्ये किर्तनकार सहभागी होणार असल्याचे संकेत खुद्द वाहिनेनंच दिले आहेत. बिग बॉसच्या नवीन प्रोमोमध्ये महेश मांजरेकर किर्तनकाराच्या रुपात दिसत आहेत. त्यावरुनच हे तर्क लढवले जात आहेत.
 
 
बिग बॉस मराठीच्या आधीच्या प्रोमोजमधून महेश मांजरेकर वेगवेगळ्या अंदाजामध्ये प्रेक्षकांसमोर आले. आता तर ते थेट एका किर्तनकाराच्या रुपात दिसत आहेत. महेश मांजरेकरांची ही वेगवेगळी रुपं बघून बिग बॉसच्या घरात विविध क्षेत्रातील कलाकार प्रेक्षकांना बघायला मिळणार असल्याचं बोललं जातंय. येत्या १२मेला बिग बॉस मराठीचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता या प्रोमोंमुळे घरात कोणत्या कलाकारांची एन्ट्री होणार याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. लवकरच या नावांची अधिकृतरित्या घोषणा होणार आहे.