मालेगावमध्ये नगरसेवक किशोर महाकाळ करीत आहेत मोफत पाणीपुरवठा
   दिनांक :03-May-2019
इतर नगरसेवकानी सुद्धा व्यवस्था करण्याची गरज
 
मालेगाव: सध्या मालेगाव शहर हे पाणीटंचाईच्या सावटाखाली असून, धरणातील पाणी साठा गढुळ येत आहे. विहिरी बोअर आटल्या आहेत. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली असून, प्रत्येक जण पाण्याच्या शोधात आहे. मात्र, प्रभाग क्रमांक 12 मध्ये नगरसेवक किशोर महाकाळ यांनी स्वतःचा शेतातून पाईपलाईन आणून आपल्या प्रभागात पाणीवाटप सुरू केले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रभागात थोडा दिलासा मिळाला आहे.
 

 
 
मालेगाव शहरात पाण्यासाठी एकमेव स्त्रोत मध्ये कुरळा धरण यावर मालेगाव पाणीपुरवठा अवलंबून होता. परंतु कुरळा धरणातील पाणी एक महिन्यापूर्वी आटल्याने पाणी टंचाई निर्माण झाली. मात्र, मालेगाव शहरात येण्यासाठी मागील वर्षी नगरपंचायत ने एक कोटी रुपये प्रशासनाने मंजूर करून घेतले. त्याने चाकातीर्थ ते कुरळा पाणी आणून ते पाईपलाईन द्वारे मालेगावात वाटप करणे सुरु आहे. मात्र, पाहिजे त्या प्रमाणात पाणी मिळत नसल्याने नागरिकनाची धावपळ होत आहे.
काही ठिकाणच्या बोअर विहिरी आटल्याने नागरिक पाणी विकत घेत आहेत. पाणी विकत घेण्यासाठी 300 ते 400 रुपये मोजावे लागतात हे सुद्धा आणि वेळेवर मिळत नाही. अशा परिस्थितीत प्रभाग क्रमांक 12 मध्ये भाजपाचे नगरसेवक किशोर महाकाळ यांनी तीन वर्षांपासून त्यांच्या शेतातून एक ते दीड किलोमीटर पाईपलाईन आणून पाणी वाटप सुरू केले होते. हे या वर्षीसुद्धा तसे सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे. प्रत्येक नगरसेवकाने आपापल्या प्रभागात नागरिकांसाठी पाण्याची व्यवस्था केली तर नागरिकांना फायदा होईल.