प्ले ऑफच्या लढतीपूर्वी दिल्ली कॅपिटल्सला धक्का

    दिनांक :03-May-2019
आयपीएल 2019,
आयपीएलच्या प्ले ऑफ मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा प्रमुख गोलंदाज कागिसो रबाडाने आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे रबाडाला विश्रांतीचा सल्ला दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने दिला आहे. त्यामुळे त्याला आयपीएलमधील उर्वरीत लढती खेळता येणार नाहीत.
 
 
रबाडा काही दिवसांपूर्वी पाठीत दुखत होते. त्यानंतर त्याच्यावर वैद्यकीय उपचार आणि चाचणी करण्यात आली. या चाचणीचे अहवाल दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाला पाठवला. त्यांनी रबाडाबाला विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत रबाडा हा दक्षिण आफ्रिका संघाचा प्रमुख शिलेदार आहे. त्याच्या बाबतीत कोणताही निष्काळजीपणा आफ्रिकेसाठी धोकादायक ठरू शकतो.