शहीद राजु गायकवाड अनंतात विलीन
   दिनांक :03-May-2019
मेहकर बंद ठेवून नागरिकांनी दिली श्रद्धांजली.
अंत्ययात्रेत महिला पुरुष हजारोच्या संख्येने सहभागी.
मेहकर: स्वयंस्फूर्तीने शहर बंद ठेवून अत्यंत जड अंतकरणाने शहीद राजू नारायण गायकवाड यांना मेहकर वासियांनी शेवटचा निरोप दिला गायकवाड यांच्या अंत्यविधीत प्रचंड जनसमुदाय सहभागी झाला होता गडचिरोली जिल्ह्यातील खेड्याजवळ नक्षलवाद्यांनी घडवलेल्या बॉम्बस्फोटात गडचिरोली पोलीस दलातील पंधरा जवान व खाजगी वाहन चालक ठार झाल्याची घटना महाराष्ट्रदिनी 1 मे रोजी घडली होती या हल्ल्यात मेहकर येथील चव्हाण राजू नारायण गायकवाड हे सुद्धा सहभागी झाले होते यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांचे आई-वडील गडचिरोलीत रवाना झाले होते सकाळी पाच वाजता त्यांचे पार्थिव मेहकर येथील अण्णाभाऊ साठे नगर येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले सकाळी आठ वाजेपर्यंत असंख्य नागरिकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले त्यांच्या निवासस्थानाहून सकाळी साडेआठ वाजता सजवलेल्या वाहनात राजू गायकवाड यांच्या प्रतिमेसह अंत्ययात्रा काढण्यात आली तत्पूर्वी पोलीस दलातर्फे त्यांना मानवंदना देण्यात आली राजू गायकवाड अमर रहे भारत माता की जय वंदे मातरम च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला शहरातील न्यायालय परिसर पोलीस स्टेशन या मार्गाने अंत्ययात्रा नगरपालिकेच्या स्वतंत्र मैदानात पोहोचल्यानंतर शहीद स्तंभाजवळ राजू गायकवाड यांची पार्टी ठेवण्यात आले यावेळी नागरिकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले यावेळी शहरातील सामाजिक व राजकारणी मंडळींनी आपली श्रद्धांजली व्यक्त केली.
 

 
 
जानेफळ रोड वरील स्मशानभूमीत राजू गायकवाड यांना शेवटचा निरोप देण्यात आला यावेळी पोलिस दलातर्फे हवेत तीन फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. पोलीस दलातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले खासदार प्रतापराव जाधव आमदार डॉक्टर संजय रायमुलकर माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे काँग्रेसचे नगराध्यक्ष कासमभाई गवळी लक्ष्मण दादा घुमरे साहेबराव सरदार आदींनी पुष्पचक्र अर्पण करुन शहीद गायकवाड यांच्या प्रती संवेदना व्यक्त केल्या अंत्यविधीला अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक हेमंत राजपूत उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे तहसीलदार डॉक्टर संजय गरकळ उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने ठाणेदार आत्माराम प्रधान न. पा. मुख्याधिकारी वायकोस जिल्हा संघचालक शांतीलाल बोराळकर अड. अनंत वानखेडे अड. सुरेशराव वानखेडे सुरेश वाळूकर गायकवाड कलीम खान साहेबराव पाटोळे अशोक अडेलकर यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.