हमासकडून इस्रायलवर रॉकेट हल्ले
   दिनांक :03-May-2019
तेल अविव,
हमासकडून आज इस्रायलच्या भूप्रदेशात दोन क्षेपणास्त्रे डागण्यात आली. इस्रायलने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हमासने ही क्षेपणास्त्रे सोडली, असे एका स्थानिक वृत्तसंस्थेने म्हटले आहे. 

 
गाझा पट्टयातील उत्तरेकडच्या भागात हमासच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर इस्रायलच्या लढाऊ विमानांनी जोरदार बॉम्ब हल्ले केले असल्याचा दावा इस्रायलने केला आहे. त्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरासाठी हमासकडूनही क्षेपणास्त्रे सोडली गेली. या दोन्हीकडच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात किती जिवीतहानी झाली हे समजू शकले नाही. हमास आणि इस्रायलमध्ये इजिप्तच्या पुढाकारामुळे युद्धबंदी घडून आली होती. या युद्धबंदीला १ एप्रिलपासून सुरुवात झाली होती. पॅलेस्टाईन इस्रायली गेल्या वर्षी सैन्याच्याविरोधात गाझापट्टयात निदर्शने करायला सुरुवात केल्यापासून तणाव वाढला होता.