'गंभीरकडे व्यक्तीमत्वच नसून तो खूप अहंकारी आहे'

    दिनांक :03-May-2019
भारत आणि पाकिस्तान यांच्या मधील सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत असतात. बऱ्याचदा सामन्यात वाद सुद्धा पाहायला मिळाले. असाच एक वाद २००७ साली गंभीर आणि आफ्रिदीमध्ये कानपूर येथील भारत पाकिस्तान एकदिवसीय सामन्यादरम्यान पाहायला मिळाला. पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने आपल्या आत्मचरित्रामध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सलमीचा फलंदाज गौतम गंभीरवर टिका केली आहे. गंभीरकडे व्यक्तीमत्वच नसून तो खूप अहंकारी आहे अशी टिका आफ्रिदीने आपल्या ‘गेम चेंजर’ या आत्मचरित्रामध्ये केली आहे. आफ्रिदीने या पुस्तकामध्ये आपल्या खऱ्या वयाचा खुलासा केल्याने मागील काही दिवसांपासून हे पुस्तक चांगलेच चर्चेत आहे.
 
 
गंभीरबरोबरच्या नात्याचा खुलासा आफ्रिदीने या आत्मचरित्रात केला आहे. गंभीरबद्दलचा सगळा राग त्याने आपल्या लिखाणातून व्यक्त केला आहे. आफ्रिदी आपल्या आत्मचरित्रामध्ये म्हणतो, ‘काहीजणांशी खाजगी शत्रूत्व असतं तर काही जणांशी कामाशीसंदर्भात. मात्र गंभीरबद्दल वेगळचं होतं. गंभीर एकदमच विचित्र आहे. गंभीर आणि त्याचा अहंकार काय बोलणार याबद्दल. गंभीरकडे व्यक्तीमत्वच नाही. क्रिकेटसारखा महान खेळ खेळणाऱ्या गंभीरकडे व्यक्तीमत्वच नाहीय. त्याच्या नावावर विक्रमही नाहीत त्याच्याकडे आहे तो केवळ अहंकार.’
गंभीर एक खेळाडू म्हणून सतत नकारात्मक्ता घेऊन मैदानात वावरायचा अशी टिकाही आफ्रिदीने या पुस्तकातून केली आहे. ‘गंभीर हा डॉन ब्रॅडमन आणि जेम्स बॉण्ड या दोघांचे थोडे थोडे गुण असल्यासारखा वागायचा. अशा लोकांना आम्ही कराचीमध्ये सरीयल (सनकी) म्हणतो. मला आनंदी आणि सकारात्मक लोक आवडतात. तुम्ही रागीट आणि स्पर्धात्मक वर्तवणूक करत असाल तरी हरकत नाही मात्र तुम्ही सकारात्मक असावे. गंभीर तसा नव्हता,’ असं आफ्रिदीने पुरस्तकामध्ये लिहिले आहे.