जिल्हा पोलिस दलातील सहा पोलिस कर्मचारी सन्मानित
   दिनांक :03-May-2019
 
वाशीम: वाशीम जिल्हा पोलिस दलातील उल्लेखनिय कार्याबद्दल व सातत्यपूर्ण सेवा देणार्‍या सहा पोलिस कर्मचार्‍यांना पोलिस महासंचालक पदक जाहीर करण्यात आले होते. महाराष्ट्र दिननिमीत्त 1 मे रोजी पोलिस अधीक्षक कार्यालयातील प्रांगणामध्ये ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या हस्ते त्यांना पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
 
 
 
 
 
 
उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तसेच सातत्यपूर्ण सेवा देणार्‍या सहा पोलिस कर्मचार्‍याांचा पोलिस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले. यामध्ये वाशीम ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रमेश जायभाये, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रविकांत देशमुख, पोलिस मुख्यालयातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रजनीकांत अंभोरे, पोलिस मुख्यालयातील पोलिस हवालदार दिलीप गेडाम, नागरी हक्क संरक्षण पोलिस हवालदार शालीकराम झाटे, वाशीम वाहतूक शाखेचे पेालिस नाईक नंदकुमार भडके यांचा समावेश आहे. पोलिस कर्मचार्‍यांना सन्मानित करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला अप्पर पोलिस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, गृह विभागाचे पोलिस उपअधीक्षक किरण धात्रक, सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, व इतर अधिकारी कर्मचार्‍यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.