फेक फेसबूक अकाऊंट बनवून मुलीचा विनयभंग करणारा अटकेत.
    दिनांक :03-May-2019
फेक फेसबूक प्रोफाईलवरून विनयभंग करणारा आय.आय.टी. दिल्ली येथून अटक
 
वर्धा: तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक ८ एप्रिलला सकाळी १० वाजताच्या दरम्यान तिला नेहा पाटील या नावाने फेसबूकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली त्या प्रोफाइलवर पीडित तरुणीचाच फोटो असल्याने काय प्रकार आहे जाणून घेण्यासाठी तिने रिक्वेस्ट एक्सेप्ट केली असता सदर फेक फेसबूक अकाऊंटवरून तिला अश्लील मॅसेज व अश्लील फोटो पाठवून तिचा विनयभंग केला तसेच मॅसेजद्वारे तुझे वाॅशरूमधील फोटो व व्हीडीयो व्हायरल करील व बलात्कार करून शारीरीक इजा पोहचविण्याची धमकी दिल्याने तरुणीच्या रिपोर्टवरून पो.स्टे. रामनगर अप क्र 221/2019 कलम 354(ड), 506 भांदवी, सहकलम 67 माहिती तंत्रज्ञान अधिनियम सुधारीत सन 2008 चा गुन्हा नोंद नोंदवला.

 
या घटनेची तांत्रीक माहिती घेवून आरोपीचा शोध घेण्यात येत असतांनाच दिनांक १७ एप्रिलला सदर तरुणीला पुन्हा एक सुमन पाटील नावाने फेक फेसबूक प्रोफाईल फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्यावर सुध्दा फिर्यादीचा फोटो होता व समोरील आरोपी हा पुर्वी प्रमाणेच धमकीयुक्त भाषेत चॅटींग करीत होता. याबाबत सुध्दा फिर्यादीने पो.स्टे. ला माहिती दिली.
याबाबात संपूर्ण तांत्रीक माहिती एकत्र करून तपासणी केली असता सदर दोन्ही फेसबूक अकाऊंट दिल्ली येथील इंडीयन इंन्स्टीट्यूट ऑफ टेक्नाॅलाजी या संस्थेतून वापरत असल्याचे निदर्शनांस आले. त्यावरून गुन्हयाचे पुढील तपासार्थ एक पथक तात्काळ दिल्ली येथे रवाना करण्यात आले. सदर पथकाने मागील 6 दिवस अथक परीश्रम करून आय.आय.टी. दिल्ली येथील वरीष्ठ अधिकारी, तज्ञ यांचेकडून उपयूक्त तांत्रीक माहिती प्राप्त करून सदर प्रकरणी संशयीत म्हणून मिळून आलेल्या इसमांस आय.आय.टी. प्रशासन व स्थानिक पोलीस यांचे मदतीने ताब्यात घेण्यात आले.
आज 3 रोजी पो.स्टे. रामनगर, जि. वर्धा येथे पोहचून गुन्हयासंबंधाने विचारपूस केली असता या आरोपीचे नाव स्वप्नील सुनील मावलीकर असल्याचे समोर आले तो २३ वर्षाचा आहे. मूळचा बल्लारशाह येथील रहिवासी असलेला स्वप्नील आयआयटीमध्ये चौथ्या वर्षाला शिक्षण घेतोय.