PUBG खेळू न दिल्याने, पत्नीने मागितला घटस्फोट
   दिनांक :03-May-2019
 सध्या जगभरात पबजीची क्रेझ पाहायला मिळत असून जगभरातील तरुणाई या गेमसाठी अक्षरश: वेडी झाली आहे. PUBG हा गेम खेळू न दिल्याने एका पत्नीने पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केल्याची घटना समोर आली आहे. अजमल पोलिसांच्या सामाजिक केंद्राचे संचालक, कॅप्टन वफा खलील हे हा खटला चालवत आहेत. संयुक्त अरब अमिरात (यूएई) येथे ही घटना घडली आहे.
 
 
गल्फ न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, पत्नीने मनोरंजनासाठी तिला पब्जी खेळण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. मात्र तिला तिच्या या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आल्यामुळे घटस्फोट हवा असल्याचे पत्नीने म्हटले आहे. तसेच महिलेने नातेवाईकांशी पब्जी गेम खेळत असल्याची माहिती दिली आहे. तर पतीने पत्नीचा पब्जी खेळण्याचा वेळ वाढत जात असल्याचे  म्हटले आहे. तसेच ती या गेमच्या जास्त आहारी जात असल्याने तिचे घराकडे दुर्लक्ष होत असल्याने तिला खेळण्यापासून रोखल्याची माहिती पतीने दिली आहे. तसेच पत्नीला खेळापासून रोखून तिच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणायची नसून कुटुंब एकत्र राहावं म्हणून विरोध केल्याचं स्पष्टीकरण पतीने दिलं आहे.