आम्ही भाजपाची मते खाणार!
   दिनांक :03-May-2019
आम्ही उत्तरप्रदेशात सपा-बसपाच्या मतांना धक्का लावणार नसून, भाजपाची मते खाऊ शकतात, असेच उमेदवार त्यांच्याविरोधात उभे केले आहेत, असे विधान कॉंग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यांनी केल्यामुळे कॉंग्रेस पक्षात आश्चर्य व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे भाजपाने प्रियांकावर जोरदार प्रहार करताना आता सर्वात जुना व मोठा राष्ट्रीय पक्ष असलेल्या कॉंग्रेसने स्वत:लाच आमचा पक्ष हा काठावरचा, अगदी क्षुल्लक पक्ष असल्याची कबुली दिल्याचा आरोप केला आहे.
प्रियांका नुकतीच आपला भाऊ राहुल गांधी यांच्या अमेठी मतदारसंघात प्रचारासाठी गेल्या. तेथे त्यांनी काही नुक्कड सभाही घेतल्या. पण, जनतेचा मूड काही यावेळी राहुल गांधींना जिंकविण्याच्या स्थितीत दिसला नाही. त्यामुळे त्या निराश झाल्या होत्या. राहुलच्या दुहेरी नागरिकत्वाबाबतच्या प्रश्नावर तर त्या जाम भडकल्या होत्या. ये क्या बकवास है, अशा शब्दात त्यांनी आपला राग व्यक्त केला होता. प्रियांकाला भीती वाटत आहे की, आपण जर उत्तरप्रदेशातील अन्य मतदारसंघात सपा-बसपाच्या विरोधात उभे ठाकलो तर सपा-बसपा राहुलला आणि आपली आई सोनिया यांना मते देणार नाहीत. आधीच अमेठीत राहुलची स्थिती अतिशय वाईट आहे. अशा वेळी राहुल गांधी पराभूत झाले तर फार मोठी बदनामी होईल, या भीतीने आता प्रियांका सपा-बसपाला चुचकारत आहे.
 
 
 
तिकडे मायावती आणि अखिलेश यांनी राहुल आणि प्रियांकाला लक्ष्य केले आहे. कॉंग्रेस ही भाजपाची ‘बी’ टीम आहे, असा थेट आरोप मायावती यांनी केला आहे. कॉंग्रेस काहीही म्हणत असली तरी तिला गठबंधनाचे उमेदवार पाडायचे आहेत आणि त्यासाठी कॉंग्रेसने आमच्याविरोधात उमेदवार उभे केले आहेत. कॉंग्रेस भाजपला मदत करीत आहे, हे स्पष्टच दिसत असल्याचे मायावती यांनी म्हटले आहे. अखिलेश यादव यांनीही कॉंग्रेसवर टीका करताना म्हटले आहे की, राहुल गांधी यांना गठबंधन मजबूत व्हावे, असे वाटत नाही. त्यांनी जे उमेदवार उभे केले आहेत, ते भाजपाला मदत करण्यासाठीच उभे केले आहेत. कॉंग्रेस भाजपासोबत लढू शकत नाही. केवळ गठबंधनच भाजपाला टक्कर देऊ शकते. हे स्पष्ट दिसत असताना, ते गठबंधनला कमजोर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आधी मायावती आणि अखिलेश यांचा सूर कॉंग्रेसविरोधात सौम्य होता. पण आता मायावती आणि अखिलेश अधिक जोमाने कॉंग्रेसच्या विरोधात समोर आले आहेत. याआधी सहारनपूर येथे मायावती यांनी कॉंग्रेसला मत देऊन मुस्लिम मतांची विभागणी होऊ देऊ नका, असे आवाहन केले होते. त्यासाठी त्यांना तीन दिवस प्रचारबंदीही करण्यात आली होती. पण, आता मायावती आणखी आक्रमक झाल्याचे दिसत आहे. याचा परिणाम अमेठी आणि रायबरेलीत होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, रायबरेलीमध्ये समाजवादी पक्षाच्या व्यासपीठावर प्रियांका आल्या होत्या. त्यांचे भाषणही झाले. तिथल्या आमदाराचे म्हणणे आहे की, अखिलेश यादव यांनीच आम्हाला रायबरेली आणि अमेठीत अनुक्रमे सोनिया गांधी आणि राहुल गांधींना मदत करा, असे निर्देश दिले आहेत. पण, मायावतींनी अजून आपले पत्ते उघड केलेले नाहीत. आता मायावती काय भूमिका घेतात, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. मायावती या धूर्त राजकारणी आहेत. त्या केव्हा काय निर्णय घेतील, याचा थांगपत्ताही त्या लागू देत नाहीत, अशी त्यांची ख्याती आहे.
अमेठीत िंप्रयांकाला पत्रकारांनी छेडले असता त्या म्हणाल्या, जेथे आमचे उमेदवार मजबूत आहेत, तेथे आम्ही िंजकण्यासाठी प्रयत्न करू. पण, जेथे आमचा उमेदवार कमकुवत आहे तेथे आम्ही भाजपाची मते कमी कशी होतील, याचा प्रयत्न करू. आमची व्यूहरचना अगदी स्पष्ट आहे. पण, मायावती आणि अखिलेश यांचा प्रियांकाच्या विधानावर विश्वास नाही.
प्रियांकाने सपा-बसपा-रालोद यांना कितीही चुचकारण्याचा प्रयत्न केला तरीही या गठबंधनाला असे वाटते की, कॉंग्रेसने आमची मते खाण्यासाठीच आमच्याविरोधात उमेदवार उभे केले आहे. प्रामुख्याने जेथे गठबंधानचे मुस्लिम उमेदवार आहेत, तेथे कॉंग्रेसने आवर्जून मुस्लिम उमेदवार उभे केले आहेत. बसपाचे एक पदाधिकारी म्हणाले, प्रियांकाच्या विधानावर विश्वास ठेवणे कठीण आहे. कारण, त्यांनी उभे केलेले उमेदवार हे गठबंधनाला कमकुवत करू शकतील, असे आहेत. जेथे मुस्लिम मतदार अधिक संख्येत आहेत, अशा 7-8 ठिकाणी कॉंग्रेसने आपले मुस्लिम उमेदवार दिले आहेत. याचा अर्थ काय? अर्थ स्पष्ट आहे. गठबंधनाची मते विभाजित करण्यासाठीच कॉंग्रेस ही खेळी खेळत आहे.
प्रियांकाच्या एका विधानावरून असे दिसत आहे की, जर सपा-बसपा-रालोद यांच्या उमेदवारांना कॉंग्रेसला धोका होणार असेल, तर मग रायबरेली आणि अमेठीत गठबंधन दोघांच्याही विरोधात छुप्या पद्धतीने काम करू शकतात. निदान मायावती तरी गुप्तपणे तसा आदेश देऊ शकतात.
केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी प्रियांकावर प्रहार करताना म्हटले आहे की, शंभर वर्षांपेक्षा जुन्या पक्षाची स्थिती आज काठावरचा, दुसर्‍यांची मते कापणारा पक्ष अशी झाली आहे. प्रियांका काहीही म्हणत असल्या तरी आमच्या मतांना मुळीच धोका नाही. धोका आहे तो गठबंधनाच्या उमेदवारांना. त्याची दखलही गठबंधनाने घेतलेली दिसत आहे.
राहुल गांधींवरही जेटली भडकले. 2016 मध्ये भारत तेरे टुकडे होंगे म्हणणार्‍या लोकांना समर्थन देणारी कॉंग्रेस आज कोणत्या थराला पोहोचली आहे, हे लक्षात येते. ज्यावेळी वििंहप म्हणते, गर्व से कहो हम िंहदू है... तेव्हा हेच दिग्विजयिंसग त्यांना सांप्रदायिक म्हणाले होते. आता ते आपल्या प्रचारासाठी साधूंना पाचारण करीत आहेत. आता त्यांना साधू सांप्रदायिक दिसत नाहीत. कारण, निवडणूक िंजकायची आहे. हे आणखी कुणी नसून ‘निवडणुकीपुरते िंहदू’ आहेत, असा आरोप जेटली यांनी केला.
अरिंवद केजरीवाल यांनी नुकतेच एक विधान केले की, अन्य पक्षाचे लोक तुम्हाला पैसे देतील. ते घेऊन घ्या. पण, मतदान आपलाच करा. केजरीवाल यांच्या विधानाकडे लक्ष वेधले असता, जेटली म्हणाले, काही नेत्यांच्या विधानावर प्रतिक्रिया न दिलेल्याच बर्‍या. त्या नेत्यांची तशी लायकीच नाही.