मोदी सरकारमध्ये अमित शाह यांना केंद्रीय मंत्रीपद

    दिनांक :30-May-2019
तभा ऑनलाईन टीम
नवी दिल्ली,
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  शपथ घेतल्यानंतर राजनाथसिंह व त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर अमित शाह यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली. अमित शाह यांच्याकडे  कोणते  खाते देण्यात आले आहे ते स्पष्ट होणार आहे मात्र त्यांना केंद्रीय मंत्रिपद देण्यात आले आहे. अमित शाह यांची केंद्रीय मंत्रीपदावर निवड झाल्यावर आता भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण बसणार याचीही चर्चा रंगली आहे.
 
 
अमित शाह यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होता जाईल असा अंदाज विविध राजकीय तज्ज्ञांकडून वर्तवला जात होता जो खरा ठरला आहे. अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुका पार पडल्या. ज्यामध्ये भाजपाला घवघवीत यश मिळाले होते.
 
 
 
आता त्यांना मंत्री म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण विराजमान होणार हा प्रश्न चर्चिला जातो आहे.अमित शाह यांच्या नावाची घोषणा होताच उपस्थित भाजपा समर्थकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.