फॅशन कान्सची

    दिनांक :30-May-2019
- सृष्टी परचाके 
 
कान्स फिल्म महोत्सवाच्या रेड कार्पेटवर बॉलिवूडच्या एक नाही, दोन नाही, तर चक्क तीन-तीन अभिनेत्रींनी आपल्या फॅशनचा जलवा दाखवला. आपल्या क्लासी आणि हटके लूकमुळे आज त्यांची चर्चा सर्वत्र होत आहे. दीपिका पदुकोण सलग चौथ्या वर्षी कान्सच्या रेड कार्पेटवर दिसली, तर कंगनाचे हे दुसरे वर्ष होते. बॉलिवूड आणी हॉलिवडूमध्ये आपल्या अभिनयाने आपला ठसा उमटवणार्‍या प्रियांका चोप्राने या वर्षी कन्समध्ये पदार्पण केले. भारतीय अभिनेत्रींनी परिधान केलेल्या विविध हटके आऊटफिटस्‌ची चर्चा आज सर्वत्र होत आहे. अशाच काही आऊटफिटस्‌बद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे.   

 
  
दीपिका पदुकोण
बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण सलग चार वर्षे कान्सच्या रेड कार्पेटवर दिसली. पांढर्‍या रंगाच्या प्लंजिंग नेकलाईन असणारा पफ स्लीव्ह आणि हाय स्लिट असणारा लॉंग ट्रेल गाऊन तिने परिधान केला होता. तिच्या पांढर्‍या रंगाच्या गाऊनवर काळ्या रंगाचा मोठा बो शोभून दिसत होता. दीपिकाने हाय पोनीटेल हेयरस्टाईल या गाऊनवर केली होती. दीपिकाने कान्सच्या पाचव्या लूकमध्ये ट्यूल गाऊनसोबत टर्बन परिधान केले होते. त्यामुळे दीपिकाचा लूक आणखी सुंदर दिसत होता. रेड कार्पेटसाठी दीपिका पदुकोणने पहिल्यांदा टर्बन लूक केला होता. तिच्या या बोल्ड लूकची सोशल मीडियावर फार चर्चासुद्धा झाली. दीपिकाने परिधान केलेल्या या टर्बनची किंमत 585 पाउडंस्‌ म्हणजेच 52 हजार रुपये इतकी होती.
 
 
कंगना रणौत
बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत आपल्या फॅशनसाठी ओळखली जाते. कंगना कान्सच्या रेड कार्पेटवर दुसर्‍यांदा दिसली. कंगनाने इंडियन टच देण्यासाठी साडी परिधान केली होती. कंगना, कान्स 2019मध्ये सोनेरी रंगाची कांजीवरम्‌ साडी नेसून रेड कार्पेटवर अवतरली होती. त्याचबरोबर सोनेरी रंगाचे हेवी वर्क असणारा कॉर्सेट डिजाईन ऑफ शोल्डर ब्लाऊज आणि आपल्या लूकला थोडासा वेस्टर्न टच देण्यासाठी जांभळ्या रंगाचा हॅण्ड वॉर्मर परिधान केला होता. कंगनाचा हा देसी लूक फारच क्लासी दिसत होता.
 
कंगना राणौतने साडीवर बन हेयरस्टाईल केली होती. तसेच कंगनासुद्धा पांढर्‍या रंगापासून स्वतःला दूर ठेवू शकली नाही. कंगना, कान्सच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांत पांढर्‍या आउटफिटस्‌मध्ये दिसून आली. कान्स 2019च्या एका कार्यक्रमात कंगना सिंगल स्लिव्ह असणार्‍या शॉर्ट ट्रेल आणि साईड स्लिट असणार्‍या अत्यंत सुंदर गाऊनमध्ये दिसून आली. कंगनाने आपला हा लूक पॉइंटेड टो हिल्स आणि एमरेल्ड ग्रीन कानातल्याने पूर्ण केला. त्यानंतर डे-आऊटदरम्यानही कंगना पांढर्‍या रंगाच्या को-ऑर्ड सेटमध्ये दिसून आली. ऑफ-शोल्डर क्रॉप टॉप आणि ए-सिमिट्रिकल शॉर्ट स्कर्टमध्ये कंगना फार कॅज्युअल, परंतु कूल दिसत होती.
 
प्रियांका चोप्रा
सर्वात पहिला लूक पाहू या कान्सच्या रेड कार्पेटवर डेब्यू करणार्‍या प्रियांका चोप्राचा. मेट गाला 2019 मध्ये केलेल्या तिच्या विचित्र लूकला नेटकर्‍यांनी ट्रोल केले होते. मात्र, कान्समध्ये प्रियांकाच्या लूकची फॅशन जगतमध्ये प्रशंसा होत आहे. प्रियांकाचा कान्स 2019च्या रेड कार्पेटमधील लूक क्लासी आणि हटके होता. प्रियांकाने काळ्या आणि रोज गोल्ड रंगाचा कॉर्सेट डिझाईन असलेला ऑफ-शोल्डर हाय स्लिट गाऊन परिधान केला होता. प्रियांकाने त्यासोबत क्लासी अक्सेसरीजसुद्धा परिधान केले होते. 

 
 
कानात मोठमोठे डॅग्लर असणारे इयररिंग्जमुळे तिला बोल्ड लूक मिळाले. यावर प्रियांकाने हेअरस्टाईल मात्र साधी ठेवली होती. तिने केस मोकळे सोडले होते. प्रियांकाच्या इतर रेड कार्पेट लूकच्या तुलनेमध्ये तिचा हा लूक फार साधारण होता.
 
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने कान्स 2019मध्ये रेड कार्पेटवर आपला डेब्यू केला. यादरम्यान आपल्या दुसर्‍या रेड कार्पेट लूकसाठी प्रियांकाने पांढर्‍या रंगाच्या सुंदर गाऊनची निवड केली होती. रेड कार्पेटव्यतिरिक्त कान्सच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये प्रियांका पांढर्‍या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसून आली. पार्टीसाठीही तिने पांढर्‍या रंगाचा ऑफ-शोल्डर कॉर्सेट स्टाईल पॅण्ट सूट परिधान केला होता. तसेच कान्समध्ये एंट्री करताना प्रियांकाने फिक्कट पांढर्‍या रंगाच्या सॅटिन ब्लेजर आणि फॉर्मल पॅण्ट परिधान केले होते.