धोनी सांगतो अनुभवाचे बोल : चहल

    दिनांक :30-May-2019
नवी दिल्ली, 
 
 
एम.एस. धोनी कर्णधारपद सोडले असले तरी कर्णधार म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही, असे युजवेंद्र चहल म्हणाला.
 
आपण यंदाच्या विश्वचषकातील महत्त्वपूर्ण फलंदाज असल्याचे धोनीने कालच आपल्या धुव्वाधार फलंदाजी प्रदर्शनातून दाखवून दिले आहे. परंतु त्याचे चतुरस्त्र संघनेतृत्व बुद्धीचातुर्यसुद्धा भारताच्या एकूण कामगिरीत महत्त्वाचा घटक ठरणार आहे.
 
 
 
 
 
 
 
जेव्हा मला काही शंका आली की, मी माहीभाईकडे जातो. तेव्हा तो आपल्या अनुभवाचे बोल सांगतो. तो केवळ मलाच नाही, तर संघातील सर्व सदस्यांना मदत करतो. धोनी यष्टीमागे असला तरी त्याची नजर आम्हा सर्वांवर व फलंदाजावर असते. तो खेळाडूच्या देहबोलीचे अचूक वाचन करतो. तो खेळाडूच्या मनातले जाणतो, असे युजवेंद्र चहल म्हणाला.
 
आम्ही दोन चेंडू टाकल्यानंतर फलंदाजाच्या हालचालीवरून तो जाणतो की, फलंदाजाच्या डोक्यात काय सुरू आहे व त्यानुसार तो आम्हाला सूचना करतो, त्या फायदेशीर ठरतात. एक गोलंदाज म्हणून कधी दिवस खराब असतो, तर कधी भाग्यशाली ठरतो. काहीवेळा षट्‌कारांचा मार बसतो, परंतु अशा परिस्थिती धोनीच्या सल्ला फायदेशीर ठरतो व धावांवर नियंत्रण राखण्यात मदत होते, असे तो म्हणाला.