पती - पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

    दिनांक :30-May-2019
वाशीम: येथील देवपेठ भागात भाड्याने राहत असलेल्या पती - पत्नीने 29 च्या रात्री घरातच आत्महत्या केल्याची घटना घडली.
यवतमाळ जिल्ह्यातील चुरमोरा येथील रहिवासी सुनील आत्माराम जाधव (वय 26) व रोषणी सुनील जाधव (वय 23) हे दोघे पती पत्नी वाशीम येथील देवपेठ भागात भाडयाच्या खोलीत राहत होते. त्यांना एक तीन वर्षाची मुलगी आहे. सुनील हा वाशीम येथे खाजगी काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. मात्र, 29 च्या रात्री दरम्यान या दाम्पत्यांनी आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपविली. या दाम्पत्याच्या पोटी एक तीन वर्षाची मुलगी आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
याबाबत फिर्यादी उत्तम खेमा जाधव यांनी वाशीम शहर पोलिसात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास वाशीम शहर पोलिस करीत आहेत.