महिला कुस्तीपटू रिना डोपिंग चाचणीत दोषी

    दिनांक :30-May-2019
नवी दिल्ली,
 
मार्च महिन्यात मोंगोलिया येथे आशियाई 23 वर्षांखालील गटाच्या कुस्ती स्पर्धेत 53 किग्रॅ  वजनगटात रौप्यपदक जिंकणारी भारतीय महिला कुस्तीपटू रिना डोपिंग चाचणीत दोषी आढळली आहे. तिला तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रीजभूषण शरण यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
 

 
 
 
काही दिवसांपूर्वी जागतिक कुस्ती महासंघाकडून आम्हाला रिना डोपिंग चाचणीत दोषी आढळल्याचे कळले. तिच्या नमुन्यात प्रतिबंधित औषधांचे अंश आढळले. प्रशिक्षक म्हणून असलेले तिच्या नातेवाईकांच्या सल्ल्यानुसार आपण वेदनेवर उपचार म्हणून इंजेक्शन घेतले होते असे रिनाने सांगितले आहे. गतवर्षी रिनाने ज्युनियर आशियाई कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक, तर 2015 आशियाई कॅडेट कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. आम्हाला पुन्हा 16 लाख रूपयांचा दंड भरावा लागेल. गत 12 महिन्यात आम्ही आधीच 32 लाख रूपयांचा भरणा केला असून आता हे तिसरे प्रकरण आहे, असे शरण म्हणाले.