निर्णायक योगदानासाठी मोहम्मद सलाह सज्ज

    दिनांक :30-May-2019
लिव्हरपूल,
 
येत्या शनिवारी टोटेनहॅम हॉटस्पविरुद्ध होणार्‍या यूईएफए चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या अंतिम सामन्यात लिव्हरपूलचा आक्रमक खेळाडू मोहम्मद सलाह निर्णायक योगदान देण्यास सज्ज झाला आहे. गतवर्षी कीव्ह येथे चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात रियाल माद्रिदविरुद्ध खेळताना सलाहच्या खांद्याला दुखापत झाली होती.
 

 
 
 
सामन्यादरम्यान सलाह आणि रियाल माद्रिदचा बचावपटू सर्जिओ रामोस यांच्यात जोरदार टक्कर झाली होती. अर्ध्या तासाने सलाहला मैदान सोडावे लागले होते. त्याची खंत सलाहला अजूनही वाटते म्हणूनच तो यंदा ती कसर भरून काढण्यास उत्सुक आहे. इजिप्तचा फॉरवर्ड सलहा विजयी गोल नोंदवून आपल्या संघाला सहावे युरोपियन चषक जिंकून देऊ इच्छित आहे. यावेळी मी पूर्णवेळ खेळण्याची आशा आहे व मी त्याकरिता रोमांचित झालो आहे. सामन्याचा निकाल उत्तम लागेल व स्पर्धा आम्हीच जिंकू, असा विश्वासही सलाहने व्यक्त केला.