हृतिकच्या चित्रपटात काम करणाऱ्यांना दहशतवादी समजून केली अटक

    दिनांक :30-May-2019
संशयित दहशतवादी म्हणून मुंबई पोलिसांनी बुधवारी पालघरमध्ये दोन जणांना अटक केली. हे दोघंजण दहशतवाद्यांसारखे कपडे परिधान करून त्या परिसरात वावरत असताना एका बँकेच्या वॉचमनने पोलिसांकडे तक्रार केली. बलराम गिनवाला आणि अरबाज खान अशी या दोघांची नाव आहेत. विशेष म्हणजे, चौकशीदरम्यान हे दोघं अभिनेता हृतिक रोशनच्या आगामी चित्रपटातील सहकलाकार असल्याचं स्पष्ट झालं.

 
सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांना या दोघांना पकडण्यात यश आलं. बलराम आणि अरबाज एका बसमध्ये चढले. पण ती बस चित्रपटाच्या शूटिंग ठिकाणी रवाना होत होती. त्याच शूटिंगसाठी हे दोघे जात होते. भादंवि कलम १८८ अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण केल्याबद्दल या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हृतिक रोशनच्या आगामी चित्रपटाची शूटिंग याठिकाणी होत होती. हे दोघे कलाकार दहशतवाद्यांच्या वेशभूषेत तिथं फिरत होते. म्हणून हे दोघे दहशतवादी असल्याचा संशय निर्माण झाला होता.