खाजगी बस पिकअपची समोरासमोर धडक

    दिनांक :30-May-2019

कांरजा अमरावती मार्गावरील घटना, बस चालक गंभीर जखमी
कारंजा लाड: लक्झरी व पिकअपची समोरासमोर धडक हेाऊन त्यात खाजगी बस चालक गंभीर जखमी झाल्याची घटना कारंजा अमरावती मार्गावरील गुरूमंदिर गोरक्षण संस्थांनजवळ 30 मे रोजी सकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली.
जखमी खाजगी बस चालकाला उपचारासाठी पुणे येथे दाखल करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार पुणे ते रायपुर ही महिंद्रा टुर्स अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्स कंपनीची सीजे 4 एई 160 क्रमांकाची खाजगी बस कारंजाहून अमरावतीकडे 30 प्रवासी घेऊन जात असतांना कारंजा अमरावती मार्गावरील गुरूमंदिर गोरक्षण संस्थानजवळ विरूध्द दिशेने येणााया पिकअपने बस समोरासमोर धडक दिली. ओव्हरटेक करण्याच्या नादात भुईमुंगाच्या शेंगा भरलेला पिकअप मधे आल्याने हा अपघात घडल्याचे बोलल्या जात आहे. यात लक्झरीचालक प्रकाश चौधरी (वय 45) हा गंभीर जखमी झाला.
जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी पुणे येथे पाठविण्यात आले. सदर अपघाताच्या घटनेत लक्झरीचे फार मोठे नुकसान झाले. दरम्यान अपघातानंतर धडक देणार्‍या पिकअप वाहनाच्या चालकाने वाहनासह घटनास्थळावरून पळ काढला. या अपघातामुळे काहीकाळ या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली हेाती. दरम्यान पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, पुढील तपास कारंजा पोलिस करीत आहे.