सातवा प्रो-कबड्डी लीग मोसम 'या' तारखेपासून

    दिनांक :30-May-2019
मुंबई,
 
 
यंदाचा सातवा प्रो-कबड्डी लीग मोसम आगामी 20 जुलैपासून प्रारंभ होणार आहे. यंदाच्या मोसमात प्रेक्षकसंख्या वाढावी म्हणून संयोजकांनी सामन्याच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या मोसमात सामने रात्री आठऐवजी संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होणार आहेत, अशी घोषणा स्पर्धेचे आयोजक मार्शल स्पोर्ट्स यांनी अधिकृत पत्रक काढून केली आहे.
 
 
 
 
 
सामन्यांच्या वेळेत बदल केल्याने टीव्हीवरुन सामने पाहणार्‍यांची सांख्य वाढण्यास मदत होईल, असा विश्वास प्रो-कबड्डी लीगचे कमिशनर अनुप गोस्वामी यांनी व्यक्त केला. सहाव्या प्रो-कबड्डी लीगचे विजेतेपद बंगळुरू बुल्स संघाने पटकावले होते.