निर्देशांक नव्या उंचीवर

    दिनांक :30-May-2019
मुंबई,
मे महिन्याचा शेवट होत असतानाच, रिलायन्स, एचडीएफसी आणि टीसीएस यासारख्या कंपन्यांच्या शेअर्सला चांगली किंमत मिळाल्याने मुंबई शेअर बाजाराने आज गुरुवारी 330 अंकांच्या कमाईसह नवा उच्चांक गाठला.
 
 
 
आज मोदी मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर महत्त्वाची खाती विशेषत: अर्थमंत्रालय कुणाच्या वाट्याला येते, याकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. गुंतवणूकदारांनी आज सकाळपासूनच खरेदीवर भर दिला होता. सकाळची सुरुवात चांगल्या कमाईने झाल्यानंतर दुपारपर्यंत कमाईने 400 अंकांचा टप्पा गाठला होता. तथापि, त्यानंतर बाजारात काही प्रमाणात घसरणही पाहायला मिळाली. सायंकाळी व्यवहार संपला, त्यावेळी 329.92 अंकांच्या कमाईसह शेअर बाजाराचा निर्देशांक 39,831.97 या स्तरावर बंद झाला. दुपारच्या व्यवहारात तो 39,911.92 अशा नव्या शिखरावरही पोहोचला होता. आजच्या व्यवहारात भारती एअरटेल, बजाज फायनान्स, टीसीएस, एचडीएफसी यस बँक आणि रिलायन्स या कंपन्यांचा फायदा, तर सन फार्मा, मिंहद्र अॅण्ड मिंहद्र, ओएनजीसी, इंडसइंड बँक आणि वेदांता यासारख्या कंपन्यांना नुकसान सहन करावे लागले.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही 84.80 अंकांची कमाई केली. दिवसभराच्या उलाढालीनंतर निफ्टी 11,945.90 या स्तरावर बंद झाला.