‘गेम ओव्हर’चा ट्रेलर प्रदर्शित

    दिनांक :30-May-2019
तापसी पन्नू आता तापसी एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. या चित्रपटाचे नाव ‘गेम ओव्हर’ असे आहे. चित्रपटाचे नाव प्रदर्शित होताच चाहत्यांना चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता होती. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चाहत्यांसाठी ही आनंदाची बाब आहे.
 
 
तापसीने ट्विटरद्वारे ट्रेलर प्रदर्शित झाला असल्याचे सांगितले असून चित्रपट १४ जून रोजी प्रदर्शित होणार असल्याचे देखील सांगितले आहे. अंगाचा थरकाप उडवणारी एखादी घडना घडून गेल्यानंतर दरवर्षी जेव्हा त्या घटनेची तारीख जवळ येते, तेव्हा मनात एक प्रकारची भीती निर्माण होत असते. तापसीसुद्धा अशाच मानसिक परिस्थितीत असून या भीतीवर मात करण्यासाठी ती मानसोपचारतज्ज्ञांचीही मदत घेताना दिसते. तसेच तिच्या भोवती सतत व्हिडिओ गेम सुरु असल्याचे देखील दिसत आहे. ट्रेलरमध्ये तापसीला महत्व देण्यात आले आहे. यावरुन असे स्पष्ट होते की चित्रपटाची संपूर्ण कथा ही तापसी आणि व्हिडिओ गेम भोवती फिरत आहे.
‘गेम ओव्हर’ हा एक थरारपट आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अंगावर काटे येतील असे काही सीन दाखवण्यात आले आहेत. हा चित्रपट तमिळसह हिंदी आणि तेलुगू या दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अश्विन सरवनन करणार असून हिंदीमध्ये अनुराग कश्यप सादर करणार आहे.
यापूर्वी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. या टीझर शेअर करताना ‘मी या चित्रपटाला हिंदीमध्ये सादर करण्यासाठी फार उत्सुक आहे. या चित्रपटाने पुन्हा एकदा ही गोष्ट सिद्ध केली आहे की दाक्षिणात्य चित्रपटांच्या निर्मितीचा दर्जा उच्चकोटीचा असतो. दिग्दर्शक अश्विन सरवननने सगळ्या सीमा भेदून दोन वेगळ्या शैली एकत्र करून हा सुंदर चित्रपट बनवला आहे’ असे अनुराग कश्यपने म्हटले होते.