उमरखेड नगर पालीकेत मोदीच्या शपथ विधी सोहळ्याचा घेतला आनंद

    दिनांक :30-May-2019
उमरखेड : आज नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा राष्ट्रपती भवनात दुसरयांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत असल्याचे लाईव्ह क्षण उमरखेड वासियांनी प्रत्यक्ष नगर पालिकेच्या प्रांगणात अनुभवले .
आज पार पडलेल्या या नयनरम्य सोहळ्यात शहर वासियांनी मोठया प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती . या शपथ सोहळ्या दरम्यान नयनरम्य आतिषबाजीने शहर वासियांचे लक्ष वेधून घेतले होते . यावेळी शहरातील नागरिक, भाजपा -शिवसेनेचे पदाधिकारी , नगराध्यक्ष व नगरसेवक उपस्थित होते.