विराट कोहलीच्या शिरपेचात मानाचा तूरा!

    दिनांक :30-May-2019
वर्ल्ड कप सुरु होण्याआधीच भारतीय कर्णधार विराट कोहलीला मोठा सन्मान मिळाला आहे. मेणाच्या पुतळ्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या मादाम तुसाँदने विराट कोहलीच्या पुतळ्याचं अनावरण केलं आहे. लॉर्ड्स मैदानावर या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. गुरुवारपासून वर्ल्ड कपच्या रणसंग्रामाला सुरुवात होणार असून हेच औचित्य साधून विराट कोहलीच्या पुतळ्याचं अनावरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
 

 
जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज असणाऱ्या विराट कोहलीचा पुतळा १५ जुलैपर्यंत म्हणजेच वर्ल्ड कप सुरु असेपर्यंत मादाम तुसाँदमध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्त्वातील भारतीय संघ ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरोधात आपला पहिला सामना खेळणार आहे.
 
 
 

 
मादाम तुसाँद लंडनचे महाव्यवस्थापक स्टीव्ह डेव्हिस यांनी सांगितलं आहे की, ‘पुढील काही आठवडे संपूर्ण देशभरात क्रिकेटचा फिव्हर असणार आहे. यामुळे आमचे शेजारी लॉर्ड्सच्या मदतीने विराट कोहलीच्या पुतळ्याचं अनावरण करण्याची यापेक्षा चांगली संधी नव्हती’.
पुढे त्यांनी सांगितलं की, ‘आम्ही अपेक्षा करतो की क्रिकेटचे चाहते मैदानात आपल्या हिरोला फक्त खेळताना पाहून आनंद घेणार नाहीत तर मादाम तुसाँदमध्ये येऊन त्यांच्यासोबत क्रीज शेअर करतील’.