देशाच्या विकासासाठी आम्ही नव्या सरकारच्या सोबत : काँग्रेस

    दिनांक :31-May-2019
नवी दिल्ली,
गुरुवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पद आणि गोपनीयतेची शपथ घेत असताना विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने ट्विट करत पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा दिल्या. भारत देश आणि देशाच्या नागरिकांची प्रगती आणि विकासासाठी आम्ही नव्या सरकारच्या सोबत काम करण्यासाठी तयार आहोत असे ट्विट काँग्रेसने केले आहे.
 
 

 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नव्या सरकारच्या मंत्र्यांच्या शपथविधी समारोहात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीएच्या प्रमुख सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग उपस्थित होते. 
 
 
 
शपथविधी सोहळ्याला देश-विदेशातील सुमारे ८००० पाहुणे सहभागी झाले होते. यात MIMSTEC देशांचे नेत्यांचाही समावेश आहे. पंतप्रधान मोदींसह ५७ इतर मंत्र्यांनी ( पंतप्रधानांसह ५८) पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.