गरीबीमुळे शेतमजूर दाम्पत्यांची आत्महत्या

    दिनांक :31-May-2019
महागांव खुर्द च्या शेतातील कोरड्या विहरीत उडी मारुन जीवन संपविले
 सासू-सासरे निराधार तर मुले झाली पोरकी
अकोट: महिन्याच्या अखेरच्या दिवशी तालुक्यातील महागांव खुर्द येथे गरीबीला कंटाळून समाधान वारुळे(४५) व बेबीनंदा वारुळे(४०) या दाम्पत्याने एका शेतातील कोरड्या विहिरीत उडी घेऊन त्यांची जीवनयात्रा संपविली.आधीच दुष्काळी परिस्थिती आणि त्यात हाताला काम नसल्याने हे दाम्पत्य जीवनात निराश झाले होते,असे बोलले जाते.
 
 
ग्रामीण पोलिसांच्या सुत्रानुसार, हे दाम्पत्य मुळचे कालवाडी येथील रहिवासी आहे.मयत समाधान वारुळे हे सासु-सास-यांचा सांभाळ करण्यासाठी त्यांची दोन मुले व पत्नीसह महागावात राहत होते.घटनेच्या आदल्या दिवशी ३० मे ला सकाळी हे दाम्पत्य इंधन आणायला जातो सांगून जे घराबाहेर पडले ते परत आलेच नाही.अखेर त्यांचे मृतदेहच नितीन हातेकर यांच्या शेतातील कोरड्या विहरीत सापडले.विहीर खुप खोल असल्याने प्रशासनाला हे मृतदेह विहीरीबाहेर काढायला महत्प्रयास करावे लागले. ग्रामीणचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तहसील कार्यालयातील तलाठींनीही पाहणी केली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. या प्रकरणी विजय बावीस्कर(५०)रा.खिरगव्हाण(ता.अंजनगांव सुर्जी) यांच्या सुचनेवरुन ग्रामीण ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.