विश्वचषक २०१९ ; पहिल्याच सामन्यात 'या' खेळाडूने केला विक्रम

    दिनांक :31-May-2019
विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात यजमान इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेवर मात करत विजयी सुरुवात केली. १०४ धावांनी इंग्लंडने सामना जिंकला. ३१२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ २०७ धावांपर्यंतच मजल मारु शकला. यादरम्यान मॉर्गन इंग्लंडकडून सर्वाधिक वन-डे सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे.

विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होण्याआधी घरच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेत, पाकिस्तानविरुद्ध सामन्यात मॉर्गनने पॉल कॉलिंगवूडचा १९७ सामन्यांचा विक्रम मोडला. आफ्रिकेविरुद्धचा सामना मॉर्गनचा २०० वा सामना ठरला आहे. मॉर्गनच्या पाठीमागे पॉल कॉलिंगवूड (१९७ सामने), जेम्स अँडरसन (१९४ सामने), अॅलेक स्टुअर्ट (१७० सामने) आणि इयान बेल (१६१ सामने) हे खेळाडू आहेत.