जम्मू-काश्मीरमध्ये चकमक; दोन दहशतवादी ठार

    दिनांक :31-May-2019
दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु असून दोन दहशतवादी ठार करण्यात आले आहेत. शुक्रवारी सकाळी दारगाड सुगन परिसरात ही चकमक सुरु झाली होती. अद्यापही चकमक सुरु आहे. भारतीय लष्कराने परिसराला चारही बाजूने घेरले असून दोन दहशतवादी लपले असल्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शोपियानमधील सुगान परिसरात भारतीय लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्स (आरआर), सीआरपीएफ आणि एसओजीने मिळून ऑपरेशन सुरु केले आहे.
 
 

 
याआधी गुरुवारी बारामुला जिल्ह्यातील सोपोरमधील डांगरपोरा येथे चकमकीत भारतीय जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले होते. यावेळी काही दहशतवादी अडकले होते. तसंच बुधवारी सुरक्षा दलांकडून शोपियान जिल्ह्यातील पिंजूरा गावात सुरु असलेल्या मोहिमेविरोधात हिंसा भडकली होती.