आईने २ मुलांना घेऊन केली आत्महत्या

    दिनांक :31-May-2019
दिग्रस: येथून ७ किलोमीटर अंतरावरील मांडवा येथे माहेरी आलेल्या २५ वर्षीय आईने आपल्या दोन चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
कल्पना अंकुश राठोड, ५ वर्षीय मुलगा युवराज व ३ वर्षीय गूड्डी मुलगी असे मृतकाचे नांव आहे. कल्पनाला सासरच्या मंडळी कडून वारंवार पैश्यांची मागणी करण्यात येत होती. पैशांची पुर्तता न झाल्याने कल्पनाने माहेरी मांडवा येथे येऊन शुक्रवार ३१ मेला गणेश मात्रे यांच्या शेतातील विहिरीत आत्महत्या केली.  
 
 
कल्पनाचा पती, सासरा, सासू, भासरा व जाऊ यांच्या विरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर आत्महत्या करुन सोबत मुलांना मारल्याने मृतक कल्पनावर भादवी ३०२ दाखल झाली आहे. या घटणेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पांडे, स.पो.नि.संगरक्षक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक वनदेव कापडे पोलिस कर्मचारी सुजीत जाधव व मनोज चव्हाण तपास करीत आहेत.