महिंद्राच्या इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढली

    दिनांक :31-May-2019
तभा ऑनलाईन टीम 
नवी दिल्ली,
महिंद्रा ॲण्ड महिंद्राच्या वाहनांच्या विक्रीत (ई-वाहन) मागील आर्थिक वर्षात 2018-19 मध्ये अडीच पट वाढ झाली असल्याची माहिती आहे. कंपनीने एप्रिल 2018 पासून मार्च 2019 दरम्यान 10,276 ई-वाहनांची विक्री केली. यामध्ये सरकारी कंपनी ईईएसएलकडून ई-वाहनांसाठी दुसर्‍या टप्प्यात मिळालेल्या ऑर्डरचे महत्त्वाचे योगदान आहे. कंपनीने या आधी मागील आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये 4,026 ई-वाहनांची विक्री केली होती. महिंद्रा इलेक्ट्रिक वाहनांच्या श्रेणीमध्ये सेडान ई-वेरिटो, व्हॅन ई-सुप्रो, कॉम्पॅक्ट कार ई-2-ओ आणि तीनचाकी वाहन ट्रेयोची विक्री करीत आहे.
 
 
 
कंपनीने एका गुंतवणूक सादरीकरणात सांगितले की, एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेडकडून (ईईएसएल) दुसर्‍या टप्प्यात जी ऑर्डर मिळाली त्याची डिलिव्हरी चालू आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये कायम राहील. ईईएसएलने सरकारी विभागांसाठी 10,000 इलेक्ट्रिक सेडान कारचा पुरवठा करण्यासाठी टेंडर काढले होते. महिंद्रा ण्ड महिंद्रा आणि त्यांची स्पर्धक कंपनी टाटा मोटर्सला ईईएसएलकडून ई-वाहनांचा पुरवठा करण्यासाठी ऑर्डर मिळाली होती. ईईएसएलने पहिल्या टप्प्यातील ऑर्डरअंतर्गत 500 ई-कार घेतल्या होत्या. यामधील 150 कारचा पुरवठा महिंद्रा ण्ड महिंद्राने तर उर्वरित 350 गाड्यांचा पुरवठा टाटा मोटर्सने केला होता.