यंदा पाऊस समाधानकारक

    दिनांक :31-May-2019
मुंबई: बळीराजासाठी  समाधानकारक बातमी भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. यंदा पाऊस समाधानकारक होणार असल्याचे भारतीय हवामान खात्याने सांगितले. राज्यात सर्वत्र सूर्य आग ओकत असताना ही बातमी सर्वांसाठी आल्हाददायी आहे.
मान्सूनचे अंदमान निकोबार बेटांवर आगमन असले तरी त्या पुढची वाटचाल मात्र धिम्या गतीने होत आहे. साधारण ६ जूनला मान्सून केरळात येईल, असा ताजा अंदाज आहे. राज्यात दाखल होण्यासाठी किमान १५ ते १७ जून पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.