मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर; अमित शाह यांच्याकडे गृह मंत्रालय

    दिनांक :31-May-2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा गुरुवारी पार पडल्यानंतर शुक्रवारी सकाळी खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. अमित शाह यांच्याकडे गृह मंत्रालयाची तर निर्मला सीतारमन यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर माजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.
 
 
 

 
 
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या महाविजयानंतर मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी सलग दुसऱ्यांदा शपथ घेतली. त्यात २४ कॅबिनेट मंत्री, ९ स्वतंत्र कारभार सांभाळणारे राज्यमंत्री आणि २४ राज्यमंत्र्यांचा समावेश होता. शुक्रवारी सकाळी खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.
 
 
 
 
 
 
 
 
मंत्रिमंडळ वाटप
अमित शहा - गृहमंत्री
निर्मला सीतारमन - अर्थमंत्री
राजनाथ सिंह - संरक्षण मंत्री
नरेंद्र सिंग तोमर - कृषीमंत्री
पीयुष गोयल - रेल्वे मंत्री
स्मृती इराणी - महिला बालकल्यान मंत्री
नितीन गडकरी - दळणवळण
प्रकाश जावडेकर - पर्यावरण आणि माहिती प्रसारण
संजय धोत्रे - मनुष्यबळ विकास राज्यमंत्री