इव्हीएममधून निघाली ४५९ जादा मते - राजू शेट्टींचा आरोप

    दिनांक :31-May-2019
कोल्हापूर: हातकणंगले मतदारसंघात मतमोजणीच्यावेळी 459 मते जास्त निघाल्याचा आरोप माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर सगळीकडे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी राजू शेट्टींनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
याची माहिती देताना राजू शेट्टी म्हणाले की, हातकणंगले मतदारसंघात इव्हीएमद्वारे एकूण 12 लाख 45 हजार 797 मतदान झाले होते. मात्र, मतमोजणीदरम्यान ईव्हीएममध्ये 12 लाख 46 हजार 256 मते मोजली गेली. म्हणजेच प्रत्यक्ष झालेल्या मतदानापेक्षा एकूण 459 मते जादा निघाली, असा आरोप करून राजू शेट्टी यांनी नमूद केले आहे की, यात पोस्टलची मते धरलेली नाहीत.
दोन वेळा खासदार राहिलेले राजू शेट्टी यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी शेट्टींचा पराभव केला.