वर्धा: लोकसभेत दोघानी वाचवली जमानत; झडनभरची जप्त

    दिनांक :31-May-2019
२ लाख ६३ हजार शासन दरबारी जमा
वर्धा: काल केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. आज खाते वाटप आले. एकंदरीत लोकसभा निवडणूक आत्ता पूर्णपणे संपली आहे. लोकसभा निवडणुकीचे वेध एक वर्ष आधी लागतात. सहा महिन्यांपासून तिकीटची फिल्डिंग लावली जाते. निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दोन चार दिवसात तिकीट जाहीर केली जाते. निवडणुकीत उभा राहणारा प्रत्येक व्यक्ती आपण निवडून येतो याच आविर्भावात वावरत असतो. वर्धा लोकसभा निवडणुकीत बसपाचे शैलेश अग्रवाल यांचा अपवाद सोडता १३ उमेदवारांनी निकण्याचे गणित मांडले होते. मात्र, भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवाराला सोडता कोणत्याही उमेदवारा आपली जमाणत वाचवता आली नाही. त्यामुळे वर्धा येथील लोकसभा निवडणुकीत उमेदवारांचे 2 लाख 63 हजार रुपये शासन दरबारी जमा झाले आहेत.
 
 
 
लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाकडे उमेदवारी अर्ज दाखल करताना सर्व साधारण उमेदवारांना २५ हजार रुपये तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवाराला त्याच्या अर्धे म्हणजे १२ हजार ५०० रुपये जमानत ठेवावी लागते. ही शासन दरबारी जमा असलेली जमानत रक्कम परत मिळण्यासाठी प्रत्यक्ष झालेल्या मतदानाच्या एक संस्ठाअंश मते मिळणे आवश्यक असते. वर्धा लोकसभा मतदार संघात वर्धा, हिंगणघाट, देवळी, आर्वी या वर्धा जिल्ह्यातील चार आणि मोर्शी आणि धामणगाव या अमरावती जिल्ह्यातील दोन अशा सहा मतदार संघ मिळून १० लाख ... मतदान झाले होते. या मतदानाच्या एक संस्थांशी मत म्हणजे जवळपास १ लाख ७१ हजार मतं होतात. हा आकडा भाजपचे उमेदवार रामदास तडस व काँग्रेसच्या उमेदवार चारुलता टोकास यांनाच पार करता आला. त्या नंतर बहुजन वंचीत आघाडीचे धनराज वनजारी आणि बसपाचे शैलेश अग्रवाल यांनाच ३५ हजार मतांचा आकडा पार करता आला. यातील बसपाचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी आपण तिसऱ्या क्रमांकावर राहू असे निवडणूक उमेदवारी अर्ज भरताना जाहीर केले होते. यात त्यांचा अंदाज चुकला. बसपाच्या परंपरागत मतदारांनी आपल्याला मतदान केले नसल्याचा आरोप त्यांनी केला. हा आरोप काही अंशी त्यांचा खरा सुद्धा आहे. २०१४ च्या निवडणुकीत जर बसपाच्या उमेदवार लाख मतांपर्यंत पोहोचला तर यावेळी सढळ हाताने व्यवहार करणारा उमेदवार लाखाच्या घरात राहणे अपेक्षित होते. मात्र, मतदारांनी यावेळी काँग्रेसला जवळ केले. त्यामुळे अग्रवाल हे तिसऱ्या क्रमांकावर राहू शकले नाही. या चार उमेदवारांनंतर उर्वरित १० उमेदवारांची तर मतसंख्या विचारताच सोय नाही अशी आहे. बहुजन मुख्यमंत्री म्हणून दोन चार कार्यकर्ते आपल्याच वाहनात घेऊन फिरणारे कवी वाकुडकर यानाही विजयी होण्याचे स्वप्न बघितले होते. मुळात त्यांनाही आपल्या जमानतीचे २५ हजार वाचवता आले नाहीत.