व्हाईट हाऊस परिसरात भारतीयाचे आत्मदहन

    दिनांक :31-May-2019
नवी दिल्ली,
अमेरिकेच्या राष्ट्रपतींचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसच्या परिसरात एका भारतीय व्यक्तीने स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. व्हाईट हाऊसनजीक मेरीलॅण्डमधील बेथेस्डाच्या 52 एकर परिसरात पसरलेल्या सार्वजनिक पार्क एलिप्स येथे अर्णव गुप्ता नावाच्या व्यक्तीने आत्मदहन केले, नंतर त्याचा मृत्यू झाला.
 

 
 
अर्णव गुप्ता बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी बुधवारी सकाळीच दिली होती, अशी माहितीही पोलिसांनी दिली. या तक्रारीनंतर अधिकार्‍यांनी त्याचा शोध घेण्यासाठी एक सार्वजनिक मदत नोटीस जारी केली होती.
 
एका वृत्तानुसार, त्याच्या कुटुंबीयांनी त्याला शेवटचे बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास बघितले होते. व्हाईट हाऊसपासून सुमारे 16 किमी दूर उत्तर पूर्व भागात असलेल्या िंसडी लेनस्थित आपल्या घरातून ते सकाळी साडेनऊच्या सुमारास बाहेर पडले होते, असेही पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी वॉिंशग्टन डीसी पोलिस पुढील तपास करीत आहे.