ठाकरेंना जगमोहन पॅटर्नची भुरळ !

    दिनांक :31-May-2019
मुंबई :  लोकसभा निवडणुकीत मनसेचा एकही उमेदवार रिंगणात नसतांनाही  मात्र, राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेऊन मोदींच्या विरोधात प्रचार केला. त्यामुळे  ते भविष्यात काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करतील अशी चर्चा होती. लोकसभेच्या निकालानंतर त्यांनी आघाडीच्या गाठीभेटी सुरूच ठेवल्याने  या चर्चेला अधिकच उधाण आले. मात्र, मनसेचे इंजिन या रुळावर धावणार नसल्याचे  पक्षातील एका नेत्याने सांगितले . 'आगामी निवडणूक मनसे स्वबळावर लढून सरकारचे अपयश जनतेसमोर ठेवेल अशी त्यांची खात्री आहे. सध्या राज्यात सक्षम विरोधक नाहीत. ही पोकळी राज ठाकरे भरून काढू शकतात,' असा विश्वास या नेत्याने व्यक्त केला. अर्थात, त्यासाठी योग्य रणनीती आखावी लागेल, हेही त्यानीं मान्य केले.लोकसभा निवडणुकीत मोदीविरोधाचा बुलंद नारा देणारे व निकालानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रत्यक्षात आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याच्या विचारात आहेत. आंध्र प्रदेशचे नवे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याप्रमाणेच ते 'एकला चालो रे'चा नारा देणार का हे लवकरच स्पष्ट होईल.