प्रियंका चोप्राच्या भावाचे लग्न तुटले, आई मधू चोप्रा यांचा खुलासा
   दिनांक :04-May-2019
प्रियंका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा याची लग्नाची तारीख ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर प्रियंका आणि मधु चोप्रा यांनी इशिता कुमारला अनफॉलो केलं. यानंतर आता दोघांचे लग्न तुटल्याची माहिती समोर येतेय.
 
 
 
पिंकवलाच्या रिपोर्टनुसार मधु चोप्राने यावर मोठा खुलासा केला आहे. त्या म्हणाल्या, सिद्धार्थ आणि इशिताच्या सहमतीनुसार हे लग्न तुटले आहे. मात्र लग्न तुटल्या मागचे कारण त्यांनी गुलदस्त्यात ठेवले आहे.
आधी इशिताच्या इमर्जेंसी सर्जरीमुळे लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आली असे कारण सांगण्यात येत होते. 27 फेब्रुवारीला सिद्धार्थ आणि इशिता कुमार यांची रोका सेरिमनी झाली. भावाच्या लग्नासाठी प्रियंका मुंबईत आली देखील होती. मात्र लग्न पुढे ढकलण्यात आल्यामुळे प्रियंका न्यूयॉर्कला परतली. त्यानंतर इशिताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सिद्धार्थसोबतचे सगळे फोटो डिलीट केले आहेत. यात रोका सेरिमनीचे फोटोदेखील होते.