आजचे राशी भविष्य, दि. ०५ मे २०१९
   दिनांक :04-May-2019

मेष - अचानक फायदा होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची साथ मिळेल. वायफळ खर्चांवर नियंत्रण ठेवा. अधिक उत्पन्नासाठी नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये नवीन काम किंवा जबाबदारी मिळू शकते. कोणतीही गोष्ट सावधतेने बोला. तब्येतीची काळजी घ्या.

वृषभ - सक्रिय राहाल. ऑफिसमध्ये नवीन काम, जबाबदारी मिळू शकते. रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. काही नवीन लोकांशी ओळख होईल. भावनात्मक मदत मिळेल. सामाजिक किंवा सामूहिक कामांसाठी लोकांशी भेट होऊ शकते. उत्साही राहाल. तब्येतीत सुधारणा होण्याची शक्यता आहे.

मिथुन - व्यवसायात फायदा होईल. नोकरदारवर्गाची बढती होऊ शकते. सोबत काम करणाऱ्यांची मदत मिळेल. अविवाहितांचे प्रेमसंबंध चांगले राहतील. कामाच्या पद्धतीत बदल केल्याने फायदा होऊ शकतो. कामाचं टेन्शन कमी होईल. करियरमध्ये पुढे जाण्यासाठी काही चांगल्या संधी मिळू शकतात. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.

कर्क - अधिकाऱ्यांकडून मदत मिळाणार नाही. व्यवसायात सावध राहा. नोकरी, व्यवसायात जे काम हाती घ्याल त्यात यश मिळण्याची शक्यता कमी आहे. व्यवसायात एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. घाई करु नका. अर्धवट राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी समस्या येऊ शकतात. पैसे सांभाळून खर्च करा. जोडीदारासोबत प्रवास होऊ शकतो. एखाद्या कार्यक्रमाची योजना आखू शकता.

सिंह - ऑफिसमध्ये काही लोकांवर प्रभाव पाडू शकता. नोकरी बदलण्याचा किंवा अधिक उत्पन्नासाठी विचार कराल. नशिबाची साथ मिळेल. नवीन सुरुवात केल्यास यश मिळेल. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. अचानक फायदा होऊ शकतो. आत्मविश्वास वाढेल. कौटुंबिक सुख मिळेल. एखादा अपघात होण्याची शक्यता आहे. सांभाळून राहा.

कन्या - नोकरी, व्यवसायात महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ आणि खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा. प्रेमीयुगुलांसाठी दिवस चांगला आहे. महत्त्वपूर्ण लोकांशी भेट होऊ शकते. नोकरीत बढतीची शक्यता आहे. तब्येतीत आधीपेक्षा सुधारणा होण्याची शक्यता आहे.

तुळ - रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. नोकरी, व्यवसायात वेळेत मदत न मिळाल्याने समस्या येतील. काही लोक तुमच्या कामासाठी विरोध करु शकतात. काही नवीन करण्याचा विचार करु शकतात. येणाऱ्या काही दिवसांत मोठ्या कामासाठी योजना आखू शकतात. जोडीदाराची मदत मिळेल. विवाह प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. विवाहित लोकांसाठी दिवस चांगला जाईल.

वृश्चिक - व्यवसायात फायदा होईल. नोकरदारवर्गासाठी दिवस चांगला आहे. रखडलेली कामं पूर्ण होतील. जबाबदाऱ्या पूर्ण होतील. काही चांगल्या संधी मिळतील. फायदा होण्याची शक्यता आहे. बाहेर फिरण्यासाठी जाऊ शकता. जोडीदाराची साथ मिळेल. तब्येतीच्या बाबतीत सावध राहा.

धनु - नोकरदारवर्गासाठी कामात अडचणी येऊ शकतात. व्यवसायिकांनी सावध राहा. वायफळ कामांत वेळ फुकट जाण्याची शक्यता आहे. कामासाठी प्रवास होऊ शकतो. प्रेमसंबंधांमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. अविवाहितांसाठी दिवस चांगला आहे. तब्येतीच्या बाबतीत सांभाळून राहा.

मकर - जुन्या समस्या संपतील. दिवस अनुकूल आहे. राहिलेली कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नोकरी, व्यवसायात नवीन कल्पना येऊ शकतात. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेूऊ नका. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. तब्येत ठीक राहील.

कुंभ - करियरसाठी दिवस चांगला आहे. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांची मदत मिळेल. चांगले बदल होण्याची शक्यता आहे. अनुभवी लोकांचा सल्ला मिळेल. धनलाभाची शक्यता आहे. महत्त्वपूर्ण लोकांशी भेट होऊ शकते. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. तब्येतीची काळजी घ्या.

मीन - काही कामात अडथळे येऊ शकतात. मेहनत अधिक करावी लागेल. नोकरी बदलण्याचा विचार मनात येऊ शकतो, परंतु त्यावर विचार करुन निर्णय घ्या. कामात घाई केल्याने नुकसान होण्याची शक्यता आहे. तब्येतीची काळजी घ्या. पैशांच्या किंवा गुंतवणुकीच्या बाबतीत एखाद्या दूरच्या व्यक्तीचा सल्ला घ्या. जोडीदाराची साथ मिळेल. वैवाहिक जीवन चांगले राहील.