फनीचे नुकसान टाळण्यात भारत यशस्वी
   दिनांक :04-May-2019
- संयुक्त राष्ट्रसंघाची पावती
 
न्यू यॉर्क,
फनी चक्रीवादळामुळे फार मोठे नुकसान होण्याची शक्यता जास्त होती, पण भारतीय प्रशासनाने आधीच आवश्यक ती काळजी घेतल्याने वादळामुळे अतिशय कमी नुकसान झाले, अशी पावती देतानाच संयुक्त राष्ट्रसंघाने आज भारताची प्रशंसाही केली.
 
 
 
फनी चक्रीवादळ कशाप्रकारे भीषण रूप धारण करेल आणि त्याचा नेमका मार्ग काय राहील, याबाबतची सूचना प्रशासनाला वेळोवेळी देण्यात आली, त्यामुळे स्थानिक राज्यांच्या प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली आणि संभाव्य नुकसान टाळले, असे या वादळाच्या हालचालींवर लक्ष ठेवून असलेल्या संयुक्त राष्ट्राच्या हवामानविषयक संस्थेने म्हटले आहे.