अनैतिक संबंधांच्या वादातून तरुणाची हत्या
   दिनांक :04-May-2019
तळेगाव : आज तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जळगावात एका तरुण युवकाच्या खुनाच्या प्रकरणाने अक्खे गांव हादरून गेले.सकाळीच एका शेताच्या धुऱ्याजवळ एका तरुणाचा म्रुतदेह आढळल्याने गावांत एकच खळबळ उडाली आहे.
जळगाव येथील रहिवासी नितीन नागोसे वय  वर्ष ह्या युवकाचे ते प्रेत असल्याचा संशय आल्यावर लागलीच पोलिसांना कळविण्यात आले.यानंतर पोलिसांनी आपल्या तपासाला २८दिलेल्या गतीमुळे अवघ्या अर्ध्या तासात या खुनाच्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले.पोलिसांनी मिळवलेली माहिती ही धक्कादायक आहे.
 

 
 
यातील म्रुतक हा हमालीचे कामं करीत असुन त्याला दारूचे व्यसन असल्याचे समजते.त्यातच त्याचे गावातीलच एका विवाहित महीलेसोबत सुत जुळले. त्यामुळे या महिलेच्या घरी म्रुतकाचे जाणे येणे सुरूच होते. गावातुन मिळालेल्या माहितीनुसार या महिलेला सुध्धा दारूचे व्यसन होते. त्यामुळे त्यांच्यात कधी कधी शाब्दिक वाद व्हायचे. या अनैतिक संबंधांची कुणकुण महिलेच्या मुलाला व पतीला लागली असल्याने त्यांनी म्रुतकाला समजावुन देखील सांगितले होते. परंतु यातील म्रूतक हा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.त्यामुळे याचा काटा काढायचाच असा निच्चय केला होता.आणी ते योग्य संधीची वाट शोधत होते आणी त्यांना ती संधी काल चालून आली. नेहमीप्रमाणे म्रुतक नितीन हा सदर महीलेच्या घरी दारू पिण्याकरता आला यावेळी महिला तिचा पती व म्रूतक तीघेही यथेच्छ दारू प्याले.यातील आरोपी महिलेचा मुलगा अजय बारापात्रे वय १७ वर्ष हा तेथे आला व त्याने हातामध्ये कुऱ्हाड घेऊन कुऱ्हाडीने म्रुतक नितीन वर सपासप वार केले यावेळी त्याला वडील संजय बारापात्रे वय वर्ष ४५ व आई उषा बारापात्रे वय ४० वर्ष या दोघानी मुलगा अजय ला मदत केली. क्षणात नितीन हा खाली कोसळला आता तो संपला याची खात्री झाल्यावर त्याचा म्रुट्देह दिवसभर घरातच ठेवला संध्याकाळ झाल्यावर त्याच्या म्रुतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याला घरामागील शेतात आणुन टाकले.सकाळी प्रातःविधी साठी गेलेल्या गावातीलच एका महिलेला नितीन नागोसे हा रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचे नजरेस पडले.तिने आरडाओरडा केल्यावर हा प्रकार उघडकीस आला.पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे गतीने फिरवली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला.