शिवसेना सोडण्याचे कारण नारायण राणे आत्मचरित्रात उलगडणार
   दिनांक :04-May-2019
मुंबई, 
 
खासदार नारायण राणे यांचे आत्मचरित्र लिहून तयार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. आत्मचरित्रातून अनेक गुपिते उघड करण्याचे संकेत राणेंनी एका मराठी वृत्तसंस्थेशी बोलताना दिले आहेत.
 
 
शिवसेना का सोडली? यामागचे खरे कारण चरित्रात आहे. उद्धव ठाकरेंनी लोकांना कसा त्रास दिला, ते या चरित्रात लिहिले आहे, असेही नारायण राणेंनी सांगितले.
 
शिवसेना, काँग्रेस आणि भाजपा असा सर्व पक्षांमधील प्रवास लिहिल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे माझे दुश्मन नाहीत, फक्त वैचारिक मतभेद आहेत, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
 
भाजपा प्रवेशामागची सर्व कारणे समोर येतील, असे सांगतानाच शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेंनी युतीधर्म कुठे पाळला आहे, असा सवालही त्यांनी केला.
 
माझे वडील हे आत्मचरित्र लिहीत असून, लवकरच त्याचे प्रकाशन होणार आहे, तर ‘अब आएगा मजा, सबका हिसाब होगा’ असे ट्विट नितेश राणे यांनी केले होते