सीएसएमटी वरून प्रवास करणाऱ्यांमध्ये मोठी घट

    दिनांक :04-May-2019
मुंबई : सीएसएमटी स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत दरवर्षी घट होत असल्याचे समोर आले आहे. दक्षिण मुंबईतून अनेक कार्यालयांचे मुंबईतील उत्तर आणि पश्चिम भागात स्थलांतर झाले आहे. त्याच्या परिणामी ही संख्या घटली असल्याचे म्हटले जात आहे. सीएसएमटी स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत जवळपास ४८ टक्के घट नोंदवण्यात आली आहे. वर्ष २००७-०८ मध्ये प्रवासी संख्या ८.८ कोटी होती. ती, २०१८-१९मध्ये घटून ४.६ कोटी झाली आहे. लांब पल्ल्याच्या गाडीतून आरक्षित आणि अनारक्षित प्रवास करणाऱ्या प्रवासी संख्येत २२ लाखाहून १३ लाख म्हणजे जवळपास ४१ टक्के घट झाली आहे.