रानडुकराच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू
   दिनांक :04-May-2019
देवळी : तालुक्यातील दापोरी शेतशिवारात वासुदेव ठाकरे ( ६५ ) हे सकाळी शेतात जात असताना त्यांच्यवर रानडुकराने हल्ला केला. त्यात ते गंभीररित्या जखमी झाले.उपचाराकरीता त्यांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले असता दुपारी २ वा. त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्याकडे ४ एकर शेती असुन या व्यवसायावर पत्नि,मुलगा व सुन हा परीवार त्यांच्या मागे आहे होता.
शासनाकडुन अजुन पर्यंत कुठलीच मदत त्यांचे पर्यंत पोहचली नाही. त्यांना लवकरात लवकर शासकीय मदत मीळावी ही आशा आहे.