फक्त १५ दिवसाच्या शूटिंगसाठी मागितले २ कोटी रुपये
   दिनांक :04-May-2019
अभिनेत्री पूजा हेगडेने आशुतोष गोवारिकरच्या मोहजोंदारो सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. यात ती ऋतिक रोशनच्या अपोझिट दिसली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. तरीही साऊथ इंडिस्ट्रीमध्ये पूजाला कास्ट करण्यासाठी फिल्ममेकर्स तयार आहेत.
 
 
 
एका वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार, वाल्मिकी सिनेमासाठी फिल्ममेकरने पूजाला अप्रोच केले होते. रिपोर्टनुसार तिला यात लक्ष्मी मेननच्या भूमिकेसाठी विचारण्यात आले आहे. हा सिनेमा जिगरठंडाचा रिमेक असल्याचे बोलले जातयं.पूजा फक्त 15 दिवसांच्या शूटिंगसाठी 2 कोटी मागितले आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार फिल्ममेकर्स अजून पूजाला एवढी रक्कम देण्यासाठी होकार दिला नाही.