जिल्हा मध्यवर्ती बँकेत दरोडा; तिजोरीसह १४ लाखांची रक्कम लंपास
   दिनांक :04-May-2019
मालेगाव: अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या येथील शाखेत तिजोरीत ठेवून असलेली १४ लाख ८९ हजार २१४ रुपयांची रक्कम चोरट्यांनी तिजोरीसह लंपास केली. ३ मेच्या रात्री घडलेल्या या घटनेने चोरट्यांचे मनोबल वाढल्याचे सिद्ध होत असून, पोलिसांच्या कार्यकर्तुत्वावर मात्र मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 
 
 
प्राप्त माहितीनुसार, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या किन्हीराजा येथील शाखेच्या चॅनल गेटचे कुलूप तोडून चोरांनी आतमध्ये प्रवेश केला. शाखा कार्यालयात ठेवून असलेली तिजोरी न फोडता ती घेवून चोरांनी पोबारा केला. याप्रकरणी शाखा अधिकारी बबन श्यामराव जाधव यांनी जऊळका पोलिस स्टेशनमध्ये ४ मे रोजी सकाळी फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला.
सदर बॅन्केतील मुख्य दरवाजाला कुलूपं होती ती अज्ञात चोरट्यांनी तोडून आत बॅन्के मध्ये प्रवेश केला. बॅन्केतील महिला कॅशअररोखपाल यांची संपूर्ण केबीन कुलूपाविनाच होती यामधील एवढया मोठया रक्कमेची तिजोरी सुध्दा बिना सुरक्षा गार्ड ची असल्याच्याच संधीचा चोरट्यांनी फायदा घेतल्याने सदर घटनास्थळी पोलीस कारवाई वृत्त लिहीस्तोवर सदरची कारवाई सुरु होती. सदरहू बँकेत सुरक्षा गार्ड, सीसी कॅमेरे नसल्याची माहिती पोलिस सुत्राकडून मिळाली. बाहेरील ग्रील गेट समोरील मुख्य दाराचे कुलूपं तोडून अज्ञात चोरांनी रात्रीच्या अंधारात बँकेत प्रवेश केला आणि रोख रक्कम सह तिजोरीच लंपास केली . बँकेचे महिला रोखपाल यांची कॅबीन कुलूपाविनाच होती, अशी घटनास्थळी चर्चा होती.
घटनास्थळी ठाणेदार बाळू जाधवर यांच्यासह अन्य पोलिस कर्मचारी धाव घेवून पंचनामा केला. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक चव्हाण, पोलिस उपअधीक्षक बनसोड यांनीही घटनास्थळी भेट देवून परिस्थितीची पाहणी केली. यादरम्यान श्‍वानपथक, फिंगर प्रिंट एक्सपर्टकडूनही तपास करण्यात आला. मात्र, वृत्त लिहिस्तोवर चोरांचा कुठलाही सुगावा लागलेला नव्हता.